कोकणातील प्रत्येक घरावर सोन्याची कौले का नाहीत ?
Nashik Admin
May 10, 2025
आंबा हा सर्व फळांचा राजा आहे आणि म्हणूनच कि काय आंबा हे भारताचे राष्ट्रीय फळ आहे !
कोकणातील हापूसचा आंबा हा जगातील सर्व आंब्यांच्रया जातीचा राजा समाजाला जातो.
त्याचबरोबर हापूस आंबा हा सर्व प्रकारच्या फळांपेक्षा पैशाने महाग असतो इतका कि किती तरी कुटुंबाचे "भरपूर आंबा खाणे" हे एक कौटुंबिक स्वप्न असते.
असा हा मौलिक गुणधर्मांचा त्रिवेणी संगम (राजा योग, राज मान्य, सोन्याची खाण) असलेल्या आंब्याचे "मालक" पद कोकणाला मिळालय पण तरीसुद्धा प्रत्येक कोकणी माणसाच्या खिशात ह्या नैसर्गिक सोन्याचा प्रभाव का दिसत नाही ? हा प्रश्न प्रत्येक विचारवंतांना "एक आश्चर्य" म्हणून पडतो तर सर्व सामान्य माणसाला हा प्रश्न "एक गूढ" म्हणून पडतो.
ह्या सोन्याच्या खाणीबरोबरच, चांदीच्या खाणीमध्ये ज्या फळांची गणना होऊ शकेल अशीसुद्धा आपल्या कोकणात बरीच फळे आहेत उदाहरणार्थ, काजू, फणस,जांभूळ, जांभ, कोकम, अळू, आवळा, चिंच, करवंदं, ताडगोळे, राईआवळे, सुपारी, केळी आणि बरेच काही कि ज्यांना शहरी, देशी तसेच आंतरदेशीय बाजारपेठेत मानाचे आणि मोलाचे स्थान मिळू शकते
ज्याच्या घराच्या परसात आणि अंगणात हे सोने आणि चांदी पिकवण्याची निश्चित ताकत असताना हा कोकणी माणूस मुंबई, पुणे आणि इतर शहरांकडे दैनंदिन उपजीविकेसाठी, सामान्य नोकरीसाठी का धावतो ? हा प्रश्न खरंच साहजिक वाटतो ना ?
हे सर्व जरी खरे असले तरी नाण्याला जशा दोन बाजू असतात तश्याच ह्या वैभवाला देखील दुसरी बाजू असू शकते कि ज्याची कोकणा बाहेरील जनतेला कल्पना नसावी/नाही.
तर मग हि नाण्याची दुसरी बाजू काय आहे हे जर आपण सर्व विचारवंतांच्या आणि तज्ज्ञांच्या समोर मांडली तर आपल्याला चर्चेअंती निश्चितच कोकणातील सर्व घरांवर सोन्याची कौले कशी चढतील, ह्याचे मार्ग, उपाय नक्कीच सापडतील अशी मनापासून इच्छा आणि विश्वास आहे.
ह्या आधुनिक तंत्रज्ञाचा (ब्लॉग) उपयोग करून चला तर मग आपण ह्या सर्व प्रश्नांवर विस्तृत विचारांची, चोफेर देवाण घेवाण करूया आणि कोकणाला मिळालेले नैसर्गिक वरदान खऱ्या अर्थाने सिद्ध करूया
आपल्याला माहित असलेले प्रश्न इथे मांडा म्हणजे आपण प्रत्येक प्रश्नावर स्वतंत्र चर्चा करू शकू.
{{heading_text}}
View all
Looks like there are no topics for this forum. Suggest topic
{{heading_text}}
View all
Looks like there are no topics for this forum. Suggest topic